आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Its Right To Live In Foreign Counitry , Say Suresh Wadkar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदेशात जाऊन राहिलेले बरे, सुरेश वाडकर यांची प्रशासनावर नाराजीचा सूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - माझ्यासारख्या कलावंताला जर जमिनीच्या व्यवहारात राजरोसपणे फसवले जात असेल, तिथे सामान्यांची काय कथा?’ असा सवाल करीत जगविख्यात गायक सुरेश वाडकर यांनी प्रशासनाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. या प्रकरणातून न्याय मिळाल्यानंतर स्वतंत्र पत्रक काढून त्याची माहिती सगळ्यांना देणार आहे, असे सांगतानाच अशा फसवणुकीपेक्षा मग विदेशात जाऊन राहिलेलं बरं, असा नाराजीचा ‘सूर’ छेडत वाडकर यांनी त्यांच्या मनातला ‘राग’ बाहेर काढला.


वाडकर एका कार्यक्रमानिमित्ताने नाशिकला आले असताना त्यांना पत्रकारांनी जमीन व्यवहारातील फसवणुकीबाबत विचारणा केली असता त्या संपूर्ण प्रकरणाबाबत आपल्याला आता काहीच बोलायचे नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘लिटिगेशन फ्री’ असलेली जागा म्हणून मला दाखवली गेली. त्यानंतर त्या जागेत सतराशे साठ समस्या असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणात माझे अपील फेटाळले गेले नसून स्टे मिळाला आहे. त्यांनी संबंधितांची नावे आताच सांगणार नसल्याचेही नमूद केले. मला न्याय मिळाल्यानंतरच त्याची माहिती देणार असल्याचे वाडकर म्हणाले.