आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jacqueline Fernandez To Be Visiting Rome With Her Father

जॅकलिन करणार वडिलांची इच्छा पूर्ण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने कधी विचारही केला नव्हता की, ती एक दिवस बॉलिवूडच्या सगळ्यात व्यग्र हिरोइन्सपैकी एक ठरेल. सध्या ती इतकी व्यग्र आहे की, तिला आपल्या घरी जाण्यासाठीदेखील सुटी मिळत नाही. मात्र, आता ती आपल्या वडिलांबरोबर रोमला जाण्याची तयारी करत आहे.

सुत्रानुसार, या महिन्याच्या शेवटी जॅकलिनच्या वडिलांचा वाढदिवस आहे. त्यांनी इटलीची राजधानी पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे जॅकलिनने वेळ काढून आपल्या वडिलांना सरप्राइज देण्याचे ठरवले आहे. जॅकलिन म्हणाली की, ‘मी वडिलांसोबत रोमला जाणार असल्यामुळे खूप उत्साहित आहे. हे शहर पाहण्याची त्यांची खूप इच्छा होती. वडिलांची इच्छा पूर्ण करत असल्यामुळे मला आनंद होत आहे.’