आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जय हो'ची पहिल्या दिवसाची कमाई केवळ 20 कोटींची, 'धूम 3'ने कमावले होते 33 कोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2014 या वर्षातील पहिला बिग बजेट आणि बिग स्टारकास्ट असलेला 'जय हो' हा सिनेमा 24 जानेवारी रोजी रिलीज झाला. या सिनेमाचा एकुण निर्मिती खर्च 110 कोटी रुपये आहे. सलमानची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाकडून ब-याच अपेक्षा असून हा सिनेमा दोनशे कोटींपेक्षा अधिक व्यवसाय करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
या सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनविषयी बोलायचे झाल्यास, सिनेमाने ओपनिंग चांगले राहिले. सुटी नसतानादेखील सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मल्टिप्लेक्समध्ये सिनेमाने चांगले प्रदर्शन केले. सिनेमाच्या एकुण कलेक्शनपैकी 65 टक्के कमाई ही पंजाबी, यूपी आणि दिल्लीतून झाली.
मुंबई, बंगळूरु आणि मैसूरमध्ये या सिनेमाने अपेक्षेप्रमाणे व्यवसाय केला नाही.
आकड्यांवर नजर टाकली असता या सिनेमाने पहिल्या दिवशी 19 ते 20 कोटींच्या घरात कमाई केली. एखाद्या बिग बजेट सिनेमाच्या कलेक्शननुसार या सिनेमाचे कलेक्शन चांगलेच झाले. मात्र अलीकडच्या काळात रिलीज झालेल्या इतर बिग बजेट सिनेमांच्या तुलनेत या सिनेमाचे कलेक्शन कमी आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या 'धूम 3' आणि 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमांनी पहिल्या दिवशी किती केली होती कमाई आणि 'जय हो'विषयी कुठले अंदाज व्यक्त केले गेले होते....