आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी एक्स्ट्रा डान्सर म्हणून काम करायची \'जय हो\'ची हिरोईन, सलमानने दिला मोठा ब्रेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेजी शाहचे आयुष्य 'रंगीला' सिनेमातील मिलीसारखेच आहे. 'रंगीला' या सिनेमात मिली एक्स्ट्रा डान्सर म्हणून करिअरला सुरुवात करते आणि मिळालेल्या एका संधीनंतर बॉलिवूड हिरोईन बनते.
डेजी शाहच्या आयुष्यातसुद्धा असेच काही घडले आहे. डेजीची प्रमुख भूमिका असलेला 'जय हो' हा सिनेमा या आठवड्यात रिलीज होणार आहे. डेजीने 2011मध्ये रिलीज झालेल्या 'भद्रा' या कन्नड सिनेमाद्वारे डेब्यू केले होते. मात्र त्यापूर्वी तिने बराच संघर्ष केला होता. ती करिअरच्या सुरुवातीच्या काळात एक्स्ट्रा डान्सर म्हणून काम करायची. त्यानंतर तिने कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यासोबत त्यांची सहाय्यक म्हणून काम करायला सुरुवात केली. 'जमीन' (2003) आणि 'खाकी' (2004) या सिनेमांसाठी तिने सहाय्यक नृत्यदिग्दर्शिका म्हणून काम केले. त्यानंतर मॉडेलिंग केले आणि आता ती सुपरस्टार सलमान खानसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
या सिनेमाच्या निमित्ताने डेजी शाहसोबत केलेली ही खास बातचित...