आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jai Ho Grosses 100 Crores At The Worldwide Box Office

4 दिवसांत \'जय हो\'ने कमवले 100 कोटी, जाणून घ्या परदेशात किती केली कमाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड स्टार सलमान खानचा अलीकडेच रिलीज झालेला 'जय हो' सिनेमाचा पहिला आठवडा उलटून गेला आहे. सोबतच, या सिनेमाने 4 दिवसांत 100 कोटींचा आकडा पार केला आहे. तसे पाहता ही कमाई फक्त भारतातली नसून परदेशातली कमाईसुध्दा त्यात सामील आहे.
'जय हो' 24 जानेवारीला रिलीज झाला होता आणि सोमवारपर्यंत या सिनेमाचा व्यवसाय 100.80 कोटी झाला. रविवारी या सिनेमाने चांगले प्रदर्शन करून 26 कोटींचे कलेक्शन केले होते. हा सिनेमा जगभरात 5000पेक्षा जास्त स्क्रिनवर रिलीज झाला होता.
सलमानच्या या सिनेमाने 100 कोटींचा आकडा पार केला असला तरी सिनेमाकडून जशा अपेक्षा केल्या जात होत्या, त्या अपेक्षा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पूर्ण करू शकला नाही. सोबतच, 'जय हो'ची तुलना 'चेन्नई एक्स्प्रेस' आणि 'धूम 3'सोबत केली जात होती.
या पॅकेजच्या माध्यामातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, या सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोणत्या दिवशी किती कमाई करून या सिनेमाने केली 100 कोटींची कमाई...?