आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jai Ho Isn't A Flop But 100 Crore On Opening Weekend, A Distant Dream

फ्लॉप नाही 'जय हो', गाठणार 100 कोटींचा पल्ला, जाणून घ्या आतापर्यंतची कमाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानचा 'जय हो' पहिल्या आठवड्यात फक्त 60-65 कोटी रूपये कमावणार असल्याची चिन्ह दिसून येत आहे. त्यामुळे या सिनेमाला फ्लॉप म्हणता येऊ शकत नाही, परंतु सलमानच्या मागील ब्लॉकब्लस्टर सिनेमांच्या यादीत हा जाऊ शकणार नाही.
याचेकारण आहे, की मागच्या वर्षी अनेक मोठ्या बॉलिवूड स्टार्सने बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट सिनेमांचे प्रदर्शन केले आहे. 2013च्या 'चेन्नई एक्स्प्रेस' आणि 'धूम 3'ने सिनेमा व्यवसायाचे सुत्रच बदलून टाकले आहे. याचा परिणाम सलमानच्या 'जय हो' सिनेमावर होत आहे, कारण हा सिनेमा कोणतेच विक्रम मोडण्याच्या मार्गावर नाहीये.
सिनेमा समीक्षक आणि ट्रेड पंडित कोमल नहाता यांनी सांगितले, ''जय हो'ला फ्लॉप म्हणता येऊ शकत नाही. हा सिनेमा सलमानच्या मागील 'एक था टायगर' आणि 'दबंग' या सिनेमांसारखा हिट ठरू नाही शकत परंतु समानधनकारक आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या 'जय हो'च्या व्यावसायाविषयी अधिक माहिती...