आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर प्रतिक्षा संपली, सलमानने स्वतः लाँच केले 'जय हो'चे पोस्टर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अखेर ब-याच मोठ्या प्रतिक्षेनंतर अभिनेता सलमान खानने त्याच्या आगामी 'जय हो' सिनेमाचे ऑफिशियल पोस्टर लाँच केले आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून स्वतः सलमानने हे पोस्टर त्याच्या चाहत्यांसमोर आणले आहे.
सिनेमाचे पोस्टर इंट्रेस्टिंग आणि इम्प्रेसिव्ह आहे. या पोस्टमध्ये सलमानचा केवळ चेहरा दिसत असून त्याचे बॅकग्राऊंड लाल रंगाचे ठेवण्यात आले आहे. त्याच्याखाली सिनेमाचे नाव 'जय हो' लिहिण्यात आले आहे. पोस्टरवर सलमानसाठी एक कॅचलाईन देण्यात आली आहे 'पिपल्स मॅन'.
सोहेल खान दिग्दर्शित या सिनेमाचे प्रसारण हक्क इरोज इंटरनॅशनलने खरेदी केले आहे. तर म्युझिक टी सीरीजचे आहे. सलमानचे चाहते या सिनेमाचे आतुरतेने वाट बघत आहेत.