आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर शह मुसाफिर, सफर में जिंदगानी है...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक शतकांपासून एक लोकगीत गायले जात आहे. व्यापार्‍यांसोबत माझे लग्न करू नका, अशी प्रार्थना मुलगी आपल्या वडिलांना करते, असा याचा आशय आहे. ती म्हणते, ‘शादी व्यापारी से नहीं करना, महल चौबारा देगा, सुनार से मत करना, गहनों से लाद देगा, मेरी शादी एक लुहार से करना जो मेरी बेडियों को काट देगा.’ इम्तियाज अलीचा ‘हायवे’ याच बेड्यांवर आधारित आहे. या चित्रपटातील ‘लोहार’ तिचा अपहरणकर्ता आहे. तो नेहमी आपल्या आईने गायलेल्या अंगाई गीताच्या आठवणीत हरवलेला असतो. त्याच्या आईला खूप दु:ख सहन करावे लागते. मात्र, ती आपल्या मुलाला सगळ्या दु:खांपासून दूर ठेवू इच्छित असते.
नायिकेचे लहानपणीचे अनुभवही खूप भयावह आहेत. लहानपणी तिचा श्रीमंत आणि प्रभावी काका विदेशी चॉकलेट खाऊ घालून तिच्यावर बाथरूममध्ये लैंगिक अत्याचार करतो. तिने ओरडू नये म्हणून तिच्या तोंडावर हात ठेवतो. तोंडावर पट्टी बांधलेल्या प्राण्यांप्रमाणे ती ओरडत असते. हा प्रसंग जेव्हा ती आपल्या आईला सांगते तेव्हा तीदेखील तिला तोंड बंद ठेवण्यास सांगते. कदाचित आईनेदेखील असेच अत्याचार सहन केले असावेत. हे दृश्य पाहून शोएब मन्सूर यांच्या ‘बोल’ चित्रपटाची आठवण होते. शोएब मन्सूर आणि इम्तियाज अली कल्पकतेच्या एका लाटेवर स्वार आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे दिग्दर्शकाने लहानपणची ही दृश्ये दाखवली नाहीत. फक्त त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, या दु:खाची भावना आपल्याला संपूर्ण चित्रपटात पाहायला मिळते. हळूहळू दोघांमध्ये एक भावनिक नाते तयार होते. हा चित्रपट अपहरण करण्यात आलेल्या तरुणी आणि अपहरणकर्त्याची प्रेम कथा नव्हे तर ते एका दिव्य नात्याशी बांधलेले आहेत. त्यात तो कधी तिची आई असतो तर कधी वडील. दोघेही भीतिदायक अनुभवातून गेलेले असतात.
जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...