आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Janzir Come In Remake, Chiranjiv Son Entering Through Bollywood

VIDEO: ‘जंजीर’चा रिमेक सप्टेंबरमध्ये, चिरंजीवीच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅनची इमेज मिळवून देणारा ‘जंजीर’ हा सिनेमा आता नव्या रूपात येत असून दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवीचा मुलगा रामचरण या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तसेच रिमेकचा पहिला प्रोमो शुक्रवारपासून झळकण्यास सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्यात हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.


रामचरण दक्षिणेत लोकप्रिय अभिनेता असून तो बॉलिवूडमध्ये प्रथमच ‘जंजीर’ सिनेमाद्वारे प्रेक्षकांसमोर येत आहे. 2007 मध्ये त्याने तेलगू सिनेमा ‘चिरुथा’द्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर आतापर्यंत त्याचे सहा सिनेमे प्रदर्शित झाले आहेत.


चिरंजीवीने मुलासाठी बॉलिवूडमध्ये बरेच प्रयत्न केले होते. ‘जंजीर’मुळे रामचरण बॉलिवूडमध्ये आपले स्थान पक्के करेल, असा विश्वास चिरंजीवीला वाटत आहे. तसेच तेलगूमध्ये हा सिनेमा ‘तुफान’ नावाने प्रदर्शित केला जाणार आहे. तेलगू सिनेमाचा प्रोमो काही दिवसांपूर्वीच दक्षिणेत सादर करण्यात आला. शुक्रवारी हिंदी सिनेमाचा प्रोमो यू ट्यूबवर सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.‘जंजीर’ची निर्मिती रिलायन्स एंटरटेन्मेंट, पुनीत आणि सुमीत प्रकाश मेहरा, फ्लाइंग टर्टल फिल्म्स करत असून सहनिर्माता रॅम्पेज मोशन पिक्चर्स आहेत. सिनेमात रामचरणबरोबर प्रियंका चोप्रा, प्रकाश राज, माही गिल, अतुल कुलकर्णी आणि शेरखानच्या भूमिकेत संजय दत्त दिसणार आहेत.


तेलगूतही प्रदर्शित होणार
आजवर दक्षिण भारतीय सिनेमांचे रिमेक आपल्याला हिंदीत दिसले आहेत, परंतु ब-याच कालावधीनंतर एखादा हिंदी सिनेमा पुन्हा तयार करून तो तेलगूतही प्रदर्शित केला जात आहे. यापूर्वी अमिताभ बच्च्न यांचे ‘दीवार’, ‘त्रिशूल’ आणि ‘अमर अकबर अँथनी’ या सिनेमांचे साऊथमध्ये रिमेक झाले असून अनेक सिनेमांमध्ये रजनीकांतने नायकाची भूमिका साकारलेली आहे.


अतुल कुलकर्णी जे.डेंच्या भूमिकेत ?
तेल माफियांवर आधारित असलेल्या ‘जंजीर’ या सिनेमात अभिनेता अतुल कुलकर्णी क्राइम रिपोर्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे प्रख्यात दिवंगत पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या व्यक्तिमत्त्वाशी साधर्म असणारी भूमिका अतुल साकारत असल्याची चर्चा आहे. मुंबईच्या गुन्हेगारी क्षेत्रातील खोलवरच्या बातम्या देणारे पत्रकार डे यांची जून 2011 मध्ये हत्या करण्यात आली होती. या खटल्यात जिग्ना व्होरा हिला अटक करण्यात आली होती.

व्हिडिओवर क्लिक करा आणि बघा या सिनेमाचा फस्ट लूक...