आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलीवूडसाठी जपानच्याही पायघड्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हिंदी चित्रपटांची मोहिनी परदेशातही असल्याचा प्रत्यय बुधवारी आला. जपानच्या वाकायामा प्रीफेक्चर प्रांतांच्या गव्हर्नरांनी प्रचारासाठी बॉलीवूडची मदत घेण्याचे ठरवले आहे. चित्रपटसृष्टीतील शिष्टमंडळाशी गुरुवारी एक बैठक आयोजित करण्यात आली असून यात पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्यासह योशिनोबू निसाका, जपानाचे उच्चायुक्त कियोशी असाका निर्माते मुकेश भट्ट व अन्य निर्माते-तंत्रज्ञ उपस्थित राहणार आहेत.


वाकायामा प्रांताचे गव्हर्नर योशिनोबू निसाका शिष्टमंडळासह महाराष्ट्राच्या दौ-यावर आले आहेत. बुधवारी महाराष्ट्र आणि वाकायामा प्रांतात पर्यटक देवाणघेवाणीसह अन्न प्रक्रिया आणि कृषी उद्योगास चालना देण्यासंदर्भात करार करण्यात आला. यासोबतच प्रांताच्या प्रचारासाठी बॉलीवूडची मदत घेण्याचेही शिष्टमंडळाने ठरवले आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाकायामा प्रांतात चित्रीकरणासाठी लोकेशन आणि संबंधित सर्व प्रक्रिया करण्याची व्यवस्था असल्याने बॉलीवूडला तेथे आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाकायामा होन्यू बेटावरील कीई पेनिनसुला येथे वसलेला प्रांत आहे. तसेच येथे अत्यंत रमणीय समुद्र किनारा असून चित्रपटासाठी चांगली स्थळे आहेत. ही स्थळे जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बॉलीवूडची मदत जपान घेणार आहे.


तसेच येथे फिल्म मेकिंग आणि प्रोसेसिंगची सुविधाही उपलब्ध आहे. निर्मात्यांना चित्रिकरणासह प्रोसेसिंगची सुविधा वाजवी दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे.