Home »TV Guide» Jassi Fame Mona Singh Married To Vidyut Jamwal

'जस्‍सी' फेम मोना सिंगने केले लग्‍न? चित्रपट प्रदर्शनापर्यंत ठेवणार गोपनीय

वृत्तसंस्‍था | Feb 25, 2013, 12:00 PM IST

  • 'जस्‍सी' फेम मोना सिंगने केले लग्‍न? चित्रपट प्रदर्शनापर्यंत ठेवणार गोपनीय

मुंबई- छोट्या पडद्यावरील हिट अभिनेत्री मोना सिंग हिने बॉलीवूड अभिनेता विद्युत जामवालसोबत लग्‍न केल्‍याची चर्चा पसरली आहे. दोघांनी मात्र हे वृत्त चुकीचे असल्‍याचा दावा केला आहे. परंतु, त्‍यांच्‍या जवळच्‍या सुत्रांनी लग्‍नाच्‍या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मोना सिंगने वषभरापूर्वी विद्युतसोबत अफेअर असल्‍याचे सांगितले होते. आता दोघांनी गुपचूप लग्‍न केल्‍याची बातमी पसरली आहे. कोणालाही त्‍यांनी लग्‍नाबद्दल माहिती होऊ दिले नाही. परंतु, जाहिरपणे प्रेमप्रकरण उघड करणारी जोडी गुपचूप लग्‍न का करेल? या प्रश्‍नाचे उत्तर दोघांच्‍या सुत्रांनी दिले. विद्युतने कधीही खासगी आयुष्‍य उघड केले नाही. त्‍याच्‍या आगामी चित्रपटाच्‍या निर्मात्‍यानेही लग्‍न झाल्‍याचे उघड न करण्‍याचा सल्‍ला दिला होता. याचे महत्त्व मोना सिंगलाही ठावूक असल्‍यामुळे तिनेही लग्‍न गुप्‍त ठेवण्‍यास सहमती दिली. स्‍वतःला तिने 'क्‍या हुआ तेरा वादा' चित्रपटामध्‍ये व्‍यस्‍त ठेवले. विद्युतचा चित्रपट प्रदर्शित झाल्‍यानंतर लग्‍नाची अधिकृत घोषणा होऊ शकते.

मोनाला याबाबत विचारले असता ती काहीशी चिडुन म्‍हणाली, ही अफवा कोण पसरवत आहे? हे जरा अतिच झाले. प्रत्‍येक मुलगी लग्‍नाचे एक मोठे स्‍वप्‍न उराशी बाळगते. मी माझे लग्‍न कशाला लपवू? मी तर उलट अधिकृत घोषणा करुन छायाचित्रेही शेअर करेन. विद्युतच्‍या पीआरओनेदेखी लग्‍नाचे वृत्त हास्‍यास्‍पद असल्‍याचे सांगून लग्‍न झाल्‍याचे फेटाळले.

Next Article

Recommended