आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

49 दिवसांनंतर मिळाला जतीन-ललितच्या बहिणीचा सांगाडा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नवी मुंबईतील एका शाळेनजीक मंगळवारी मानवी सांगाड्याचे अवशेष सापडले. डिसेंबरमध्ये बेपत्ता झालेली आयकर अधिकार्‍याची पत्नी व संगीतकार जतीन- ललित यांची बहीण संध्या हिचे ते अवशेष असल्याचे समजते.
बेपत्ता महिलेच्या घराजवळील परिसरातच हा सांगडा भूवैज्ञानिक मायकेल ओटेस यांना दिसला. तो संगीतकार जतीन आणि ललित आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुलक्षणा व विजेता पंडित यांची बहीण संध्या सिंगचा (50) असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संध्या मुंबईतील एका बँकेत 25 लाखांचे दागिने जमा करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र वाटेतच नेहरु परिसरातून त्या बेपत्ता झाल्या होत्या.


50 हजारांचे बक्षीस
13 डिसेंबर रोजी संध्या या 20 लाख रुपयांचे दागिने लॉकरमध्ये ठेवण्यासाठी नेरूळमधील अभ्युदय बँकेत गेल्या होत्या. मैत्रीण उमा गौर यांनी त्यांना कारने बँकेपर्यंत सोडले होते. तेव्हापासून संध्या बेपत्ता आहेत. त्यांचे पती जयप्रकाश सिंह हे इंदूरमध्ये अबकारी आणि सीमाशुल्क आयुक्त आहेत. संध्या बेपत्ता झाल्यानंतर त्यांची माहिती देणार्‍यास सिंग यांनी 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.