आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद खोलीत दुखण्याने कण्हत होते जावेद अख्तर, नोकराने काच फोडून काढले खोलीबाहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शोले, दिवार यांसारख्या गाजलेल्या सिनेमांचे प्रसिध्द लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांना दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पाठीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयार दाखल करण्यात आले. अलीकडेच पाठीतील दुखण्यामुळे ते हालचाल करु शकत नव्हते. त्यामुळे त्यांच्या केअरटेकरने बाथरुमच्या दाराला लागलेली काच फोडून त्यांना खोलीबाहेर काढले.
जावेद अख्तर यांच्या पत्नी शबाना आझमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका संगीत महोत्सवात सहभागी होण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. विशेष म्हणजे पाठ दुखीचा त्रास असतांना देखील, आपल्या संगीताच्या आवडीमुळे त्यांनी या महोत्सवात उपस्थिती लावली होती. परंतु, संगीत समारोह संपल्यावर त्यांनी पाठीत मोठ्या प्रमाणावर दुखत असल्याची तक्रार केली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी पत्नी शबाना आझमी त्यांच्यासोबत होत्या.
पुढे वाचा, काय सांगितले शबाना आझमी यांनी...