आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : अशाप्रकारे मिळाला होता जया बच्चनला करिअरमधला पहिला सिनेमा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जया भादुरी अर्थातच जया बच्चन यांनी नुकताच आपला 64 वा वाढदिवस साजरा केला. जया यांचा जन्म 9 एप्रिल 1948 रोजी मध्यप्रदेशमधील जबलपूरमध्ये झाला होता. त्यांनी भोपाळमधील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. जया यांनी वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत भरतनाट्यमचे शिक्षणही घेतले होते.

'सुमन'मध्ये पहिल्यांदा केला होता कॅमेरा फेस

जया बच्चन यांना वयाच्या 15व्या वर्षी सत्यजित रे यांच्या 'महानगर' या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र यापूर्वी भारतीय फिल्म अँड टेलिव्हिजन फिल्म इंन्स्टिट्यूटमध्ये 'सुमन' या सिनेमासाठी जया पहिल्यांदाच कॅमे-यासमोर आल्या होत्या. ऋषिकेश मुखर्जी यांनी 'सुमन' हा सिनेमा बघून जया बच्चन यांची निवड 'गुड्डी' या सिनेमासाठी केली होती.

तेव्हा जया बच्चन या इन्स्टिट्युटमध्ये शिकत होत्या. याच काळात बासू चॅटर्जी यांनी देखील जया यांना सिनेमाची ऑफर दिली होती. मात्र जया बच्चन यांनी विनम्रपूर्वक त्यांची ऑफर नाकारली. इन्स्टिट्यूटच्या नियमांनुसार येथील विद्यार्थी शिकत असताना सिनेमात काम करु शकत नसल्याचे कारण जया यांनी चॅटर्जी यांना दिले होते.
जया यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी इन्स्टिटूटमध्ये गोल्ड मेडलही मिळवले होते.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...