आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jayprabha Studio A Private Asset Of Lata Mangeshkar, District Court Verdict

जयप्रभा स्टुडिओ लता मंगेशकर यांची खासगी मालमत्ता, न्यायालयाचा निकाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - प्रसिद्ध जयप्रभा स्टुडिओ ही लता मंगेशकर यांची खासगी मालमत्ता असून त्यांनाच तिचा विकास करण्याचा अधिकार आहे, असा निकाल जिल्हा न्यायालयाने गुरुवारी दिला. अ.भा. चित्रपट महामंडळाचा स्टुडिओवरील दावा खर्चासह फेटाळण्यात आला आहे. महामंडळ उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.


स्टुडिओतील उर्वरित जागा विकसित करण्यासाठी बिल्डर पोपटलाल गुंदेशा यांनी मंगेशकर यांना अनामत रक्कम दिल्याचे उघड झाले. त्यानंतर कोल्हापुरात मोठे आंदोलन झाले होते. व्यवहारात मध्यस्थी केल्यावरून गायक सुरेश वाडकर यांनाही आंदोलकांनी लक्ष्य केले होते.


असा केला युक्तिवाद : लतादीदींचे वकील अ‍ॅड. महादेव आडगुळे यांनी भालजी पेंढारकर यांनी स्टुडिओ विकताना खरेदीपत्रात नमूद केलेल्या अटींवर भर दिला. स्टुडिओ खासगी मालमत्ता असल्याने महामंडळाला दावा दाखल करण्याचा अधिकार नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. न्यायालयाने तो मान्य केला. लतादीदींनी 1982 मध्ये शासनाकडून करारातील अट रद्द करून घेतल्याचे वकिलांनी निदर्शनास आणून दिले.


हायकोर्टात अपील करणार : या निकालाविरुद्ध हायकोर्टात अपील करणार असल्याचे चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी सांगितले. हा कोल्हापूरच्या अस्मितेचा प्रश्न असून महामंडळ सहजासहजी हार मानणार नाही, असे सुर्वे म्हणाले.


काय आहे प्रकरण?
स्टुडिओभोवतीच्या जागेची विक्री केल्याच्या विरोधात चित्रपट महामंडळाने जिल्हा न्यायालयात लतादीदींविरुद्ध गतवर्षी दावा दाखल केला होता. भालजी पेंढारकर यांना जागा देताना चित्रीकरण व आनुषंगिक बाबींसाठीच जागेचा वापर व्हावा, अशी अट होती. लता मंगेशकर यांनी ती मोडल्याचे महामंडळाने म्हटले होते.