आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूरजच्या आयुष्यात दुस-या मुलीच्या एन्ट्रीमुळे तणावात होती जिया खान ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पदार्पणातच अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गजाबरोबर ‘नि:शब्द’ सिनेमात काम करून कौतुकास पात्र ठरलेली बॉलिवूड अभिनेत्री जिया खान (25) हिने मुंबईत आत्महत्या केली. सोमवारी रात्री जुहूतील घरात 25 वर्षांच्या जियाने फॅनला ओढणी अडकवून गळफास घेतला. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी सापडली नसल्याने आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.

पदार्पणानंतर मोजके सिनेमे वगळता जियाच्या वाट्याला फारशी प्रसिद्धी, काम आले नाही. यामुळे ती निराश होती, असे सांगितले जाते आहे. या प्रकरणी पोलिसांनी जियाचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता आदित्य पांचोलीचा पुत्र सूरजची चौकशी केली. सोमवारी रात्री जियाने शेवटचा फोन सूरजलाच केला होता. दोघांत बाचाबाची झाल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

सोमवारी आपली जीवनयात्रा संपवणा-या जीयाने त्याआधीचा विकेंड सूरजबरोबरच घालवला होता. जियाच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सूरज आणि जियामध्ये 63 वेळा फोनवर बोलणे झाले होते. दोघांनी एकमेकांना अनेक मेसेज पाठवले होते. त्यातून सूरज जियाकडे दुर्लक्ष करतोय, असे दिसून आले. शेवटच्या एसएमएसमध्ये जियाने सूरजला लिहिले होते की, U'r getting too cold.
फोनवर बाचाबाची झाल्यानंतर जिया सूरजच्या घरीही गेली होती. मात्र तिथे सूरज त्याच्या आईवडिलांबरोबर बिझी असल्याचे तिला सांगण्यात आले. त्यानंतर जिया आपल्या घरी परतली. त्यापूर्वी सूरजने जियाला एक गुलदस्ता पाठवला होता. मात्र जियाने आपल्या बिल्डिंगच्या वॉचमनला तो गुलदस्ता कचरापेटीत टाकायला सांगितला.

प्रेमाचा त्रिकोण :
पोलिस सुत्रांच्या मते, या प्रकरणात नीलू नावाच्या मुलीचेही नाव समोर आले आहे. सूरज-नीलूच्या संबंधांमुळे जिया तणावात होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.