आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूरजला दुसरी गर्लफ्रेंडच नव्हती, नीलूचे सत्य झाले उघड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येचे गुढ अद्याप उघड झालेले नाही. नैराश्येपोटी जियाने आत्महत्या केली, असे म्हटले जात आहे. करिअर आणि प्रेमात मिळत असलेल्या अपयशामुळे जियाने हे टोकाचे पाऊल उचलले अशीही चर्चा रंगत आहे. जियाच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीचीचौकशी केली. या चौकशीनंतर पोलिसांनी एक नवीन खुलासा केला आहे.
सुरुवातीला या प्रकरणाला लव्ह ट्रँगलशी जोडले जात होते. जिया आणि सूरजच्या मध्ये नीलू नावाची तरुणी आल्याचे म्हटले गेले होते. मात्र पोलिसांनी नीलूचे सत्य उघड केले आहे. जुहू पोलिसांनी बुधवारी सांगितले की, नीलू तरुणी नसून, एक महिला आहे. मुळात नीलू ही पांचोली कुटुंबीयांची जुनी जवाहीर आहे. काही दागिन्यांचे पैसे पांचोली कुटुंबीयांकडून येणे होते. त्याबद्दल तिने एसएमएस केला होता, असा खुलासा सूरज आणि आदित्य यांनी आपल्या जबाबात केला.
पोलिस सुत्रांच्या मते, सोमवारी रात्री जियाने सूरजला घरी भेटण्यासाठी एसएमएस केला होता. सूरजने तिला सांगितले की, तो 10 वाजता नीलूला भेटायला जाणार आहे. यावरुन जियाचे सूरजबरोबर भांडण झाले. सूरजने जियाचा संशय दूर करण्यासाठी तिला फोनही केला, मात्र तोपर्यंत जियाने तिची जीवनयात्रा संपवली होती.