आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जियाने सात महिन्यांपूर्वीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हताश झालेल्या जिया खानने सोमवारी रात्री गळफास घेऊन आपली इहलोकाची यात्रा संपवली. करिअर आणि प्रेमात हार मानून जियाने हे टोकाचे पाऊल उचलले, असे म्हटले जात आहे.
आपले छोटे फिल्मी करिअर घडवणा-या जियाला गेल्या तीन वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाले होते. प्रत्येक पावलावर निराशाच तिच्या पदरी पडत होती. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून ती नैराश्येने ग्रस्त होती. या नैराश्येतूनच जियाने सात महिन्यांपूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. सात महिन्यांपूर्वी जियाने दारुच्या नशेत आपल्या हाताची नस कापली होती. मात्र त्यावेळी कुटुंबीय घरीच हजर असल्यामुळे तिच्यावर तातडीने उपचार शक्य झाले होते. त्यावेळी सुदैवाने ती यातून बचावली होती.
सात महिन्यांनी जियाने पुन्हा एकदा आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. बॉयफ्रेंड सूरजबरोबर झालेल्या बाचाबाचीनंतर तिने गळफास घेतला. जियाने हे पाऊल उचलले तेव्हा घरी कुणीही हजर नव्हते. त्यामुळे तिला वाचवण्यात यश आले नाही.
गळफास लावण्यापूर्वी जियाने आपल्या आईला 'लव्ह यू' असा एसएमएसही केला होता. आपल्या मुलीचा मृत्यू बघण्याची दुर्दैवी वेळ जियाच्या आईवर आली.
नैराश्येने ग्रस्त असलेल्या जियाचा अखेर दु:खद अंत झाला आणि उदयास येणारा तारा नेहमीसाठी निखळून पडला.

जियाच्या खासगी आणि प्रोफेशनल लाईफबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...