आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jiah Khan Death: Mother Rabiya Khan Wants Her Body Exhumed

जियाच्या मृतदेहाची पुन्हा तपासणी करण्याची राबिया यांची इच्छा, FBIसोबत केली बातचीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री जिया खान हिच्या मृत्यूप्रकरणी आता नवीन खुलासा होण्याची शक्यता दिसून येत आहे. अमेरिकेचे एफबीआयचे अधिकारी जिया खान मत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तयार झाले असल्याची ताजी बातमी आहे. सोबतच, अमेरिकन एजेंसीने जियाच्या आईला आश्वासन दिले आहे, की ते त्यांच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणाचा लवकरात-लवकर उलगडा करतील.
राबिया खानच्या बाजूने खटला चालवणारे वकिल दिनेश तिवारी यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले, की FBIला भारतीय अधिका-यांकडून परवानगी मिळाली तर जियाच्या मृतदेहाची पुन्हा एकदा तपासणी केली जाईल. राबिया खान यांची इच्छा आहे, की जियाचा मृतदेह कब्रमधून काढून त्याची तपासणी केली जावी.
मागील वर्षी जिया तिच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. या प्रकरणाचा मुंबई पोलिसांनी बराच शोध लावला, परंतु जियाची आत्महत्या होती की हत्या याचा शोध लागला नाही. जियाची आई राबिया खान यांचा आरोप आहे, की त्यांच्या मुलीची हत्या झाली आहे.
आता राबिया खानेन अमेरिकन एजेंसी FBIला विनंती केली आहे, की त्यांनी त्यांच्या मुलीच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी करावी आणि आरोपीचा पर्दाफाश करावा.
सकारात्मक गोष्ट आहे, की FBIने यासाठी होकार दिला आहे आणि त्याला आता फक्त भारताकडून परवानगीची गरज आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या एका भारतीय प्रकणात कशी सामील झाली FBI आणि या प्रकरणाविषयी बरंच काही...