आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल्या वर्षभरापासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहात होते जिया-सूरज !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्येप्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. आता जियाची आई राबिया खान यांनी पोलिसांसमोर एक नवीन रहस्य उलगडले आहे. राबिया खान यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांची मुलगी गेल्या वर्षभरापासून सूरज पांचोलीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होती. जियाच्या शेवटच्या पत्रावरुन हे स्पष्ट झाले आहे की, ती प्रेग्नेंटसुद्धा झाली होती. मात्र तिला गर्भपात करावा लागला होता. सूरजने जबरदस्ती जियाचा गर्भपात केला होता, असे म्हटले जात आहे.

जियाच्या आत्महत्येप्रकरणी सूरज पांचोलीला पोलिसांनी अटक केली असून त्याला 13 जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

जिया आणि सूरज लिव्ह इन रिलेशनमशिपमध्ये राहायचे. शिवाय सूरज तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचे जियाने आपल्या पत्रात म्हटले आहे. मात्र जेव्हा जियाला सूरजने ब्रेकअप बुके पाठवला तेव्हा ती पूर्ण कोलमडली आणि त्यामुळेच कदाचित तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
सूरजची आई जरीना वहाब यांनी मात्र आपला मुलगा या संपूर्ण प्रकरणात निर्दोष असल्याचे म्हटले आहे. अशीही बातमी होती की, जरीना वहाब जियाच्या आईचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या होत्या. मात्र राबिया खान यांनी जरीनाची भेट घेण्यास नकार दिला. जरीना यांच्याबरोबर त्यांची मुलगी सनासुद्धा राबिया यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या जुहू स्थित राहत्या घरी गेली होती.

राबिया खान यांनी आरोप लावला आहे की, सूरज त्यांच्या मुलीला मारहाण करायचा. एका वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरजवर मारहाण आणि घरगुती हिंसाचाराचा खटला चालू शकतो.