आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jiah Khan Was Under Influence Of Alcohol When She Committed Suicide

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आत्महत्या करण्यापूर्वी मद्यधुंद अवस्थेत होती जिया खान!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री जिया खानचा शवविच्छेदन अहवाल आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी जिया खानने मद्य प्राशन केले होते. ती पूर्णपणे नशेत होती, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.

जिया खानच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये मद्याचे अंश सापडले आहेत, अशी माहिती शवविच्छेदन अहवालात सांगण्यात आली आहे. आता हा अहवाल पोलिसांना सोपविण्यात आला आहे.

जून महिन्याच्या सुरवातीलाच जिया खानचे तिचा बॉयफ्रेंड सूरजसोबत तीव्र मतभेद झाले होते. त्यानंतर जिया खानने जुहू परिसरातील सदनिकेत गळफास घेऊन आत्महत्या केली. जिया खानने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सूरज त्रास देत असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे सूरजला अटक करण्यात आली होती. परंतु, काही दिवसांपूर्वी त्याला जामीनावर सोडण्यात आले आहे.