आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jiah Khans Accused Suraj Pancholi For Her Death, Suicide Letter Reviled

सूरजने केला होता जियावर बलात्कार, गर्भपातही झाला होता ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केले. त्‍याचे फळ मला काय मिळाले.... तुझ्यावर प्रेम करण्‍याचे फळ म्‍हणून मला शिव्‍या, अत्‍याचार, रेप आणि अवहेलना मिळाली. तरीही मी सर्व सहन केले. तुझ्यावर प्रेम केले होते. पण, मला तू काय दिले... दुरावा, धोका आणि अवहेलना. जिथे तुझे विश्‍व पार्टी आणि सुंदर मुलींच्‍या मिठीपर्यंत मर्यादीत होते, तिथे मला माझ्या कामावर प्रेम होते. माझ्या आयुष्‍यात केवळ तूच होत आणि माझे करिअर... पण आता असं मला जगायचे नाही. मी माझ्या 10 वर्षांच्‍या करिअरला अलविदा करुन जगाचा निरोप घेत आहे. तू हे सर्व वाचत असशील त्‍यावेळी मी कदाचित खूप दूर गेलेले असेल.'

हे शब्द आहेत जिया खानच्या सुसाईड नोटमधील... या सुसाईड नोटने जियाच्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट केले आहे.
मुंबईत जिया खानची आई राबिया खानने धाडसी पाऊल उचलत जियाचे सहा पानी पत्र जगजाहीर केले आहे. या पत्राद्वारे जियाच्या मृत्यूला सूरज पांचोली जबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे.
जियाच्या आईने आपल्या मुलीचा झालेला छळ मीडियाला सांगत तिने हताश किंवा आवेशात येऊन मृत्यूला कवठाळले नाही. तर ती आपल्या शेवटच्या दिवसांत मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जात असल्याचे म्हटले. ती कोलमडली होती. तरीसुद्धा ती या परिस्थितीचा सामना करत होती. मात्र सूरजने प्रेमात दिलेल्या धोक्यामुळे तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, असे जियाच्या आईने सांगितले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या जियाने आपल्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिले...