आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jiah Khan\'s Close Friend Suraj Panscholi Summoned By Police

आदित्य पंचोलीचा मुलगा होता जियाचा बॉयफ्रेंड, दोन वर्षांपूर्वी वाढली होती जवळीकता !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येमागचे गुढ उकलण्यासाठी पोलिस तिच्या जवळच्या लोकांची चौकशी करत आहेत. जियाच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तिंमध्ये अभिनेता आदित्य पंचोली यांचा मुलगा सूरज पंचोलीचे नाव समोर आहे. सोमवारी रात्री गळफास घेण्यापूर्वी जिया आणि सूरजचे काही वेळ फोनवर बोलणे झाले होते.
असे ऐकिवात आहे की, सूरज आणि जिया गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मुंबई पोलिसांनी सूरजला चौकशीसाठी जूहूस्थित पोलिस स्टेशनमध्ये बोलवले आहे.
जिया आणि सूरजला मुंबईतील एका क्लबमध्ये अनेकदा एकत्र बघितले गेले. मात्र काही दिवसांपूर्वी जिया आणि सूरजने डेटिंगच्या बातम्यांचा इंकार केला होता. आम्ही फक्त चांगले मित्र असल्याचे त्यांना सांगितले होते.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सूरजचे आईवडील अर्थातच आदित्य पंचोली आणि जरीना वहाब जियाच्या आईचे चांगले मित्र आहेत. जियाच्या मृत्यूची बातमी मिळताच आदित्य आणि सूरज पंचोलीने जियाच्या घराकडे धाव घेतली होती.