आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jiah Khan's Dead Body; Rabbiya Khan Can't Forget This Moment

समोर आले जिया खानच्या मृतदेहाचे छायाचित्र, कटू स्मृती झाल्या जाग्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या मृत्युला तीन महिने उलटले. अद्याप तिची आई तिच्या मृत्यूच्या धक्क्यातून स्वतःला सावरु शकलेली नाही. जियाच्या आत्महत्येनंतर तिची आई राबिया खान यांनी आपले दुःख ट्विटरच्या माध्यमातून अनेकदा व्यक्त केले. राबिया खान यांनी पुन्हा एकदा आपले दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी जियाच्या डेड बॉडीचे एक छायाचित्र ट्विटरवर शेअर केले आहे. छायाचित्राखाली त्यांनी लिहिले, की ''या दिवसाला मी कशी विसरु शकते, हे दुःख मी प्रत्येक दिवशी अनुभवतेय.''
राबिया यांनी या छायाचित्राव्यतिरिक्त जियाची बरीच छायाचित्रे काही दिवसांपूर्वी शेअर केली होती.
3 जून रोजी जियाने मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. प्रेमभंग झाल्यामुळे निराश होऊन जियाने मृत्युला कवटाळले होते. त्यानंतर पोलिसांनी तिचा प्रियकर सूरज पांचोलीला अटक केली होती. ब-याच प्रयत्नानंतर सूरजची जामीनावर सुटका झाली होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा राबिया खान यांनी शेअर केलेली जियाची छायाचित्रे आणि यासह बघा जियाच्या अंत्ययात्रेत कोणकोण सहभागी झाले होते...