बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूचे रहस्य जाणून घेण्यासाठी तिची आई राबिया खान आणि कुटुंबातील काही सदस्यांनी स्टिंग ऑपरेशनचा दावा केला आहे. राबिया खान यांनी सांगितले, की स्टिंग ऑपरेशनमध्ये स्पष्ट झाले आहे, की पोलिसांनी पुराव्यांमध्ये हस्तक्षेप केल्याचे आढळून आले आहे. जिया खानचा मृत्यू मागील वर्षी 3 जून रोजी झाला होता. पोलिसांनी सांगितले होते, की जिया खानचे आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीसोबत असलेल्या नात्यात तणाव निर्माण झाल्याने तिने डिप्रशनमध्ये आत्महत्या केली होती. परंतु जियाची आई राबिया खान यांचा आरोप आहे, की जियाचा खून झाला आहे आणि पोलिस सत्य गुपित ठेवत आहेत.
फॉरेंसिक तपास करण्याची मागणी
जिया खानच्या आईने बॉम्बे हायकोर्टात एक याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये या प्रकरणाची फॉरेंसिक तपासणी केली जाणार आहे. त्यांनी दावा केला आहे, की हे प्रकरण आत्महत्या नसून हत्येचे आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा स्टिंगमध्ये बदलली डॉक्टर अग्रवाल यांची साक्ष