आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या मृत्यूतून अद्याप सावरल्या नाहीत राबिया खान, शेअर केले जियाचे शेवटचे फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूला एक महिना पूर्ण झाला आहे. गेल्या महिन्यात 3 जूनच्या रात्री जियाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. जियाच्या अशा अचानक एक्झिटमुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. विशेषतः जियाची आई राबिया खान. राबिया अद्याप आपल्या मुलीच्या मृत्यूमुळे स्वतःला सावरु शकलेल्या नाही.
जियाचा बॉयफ्रेंड सूरज पांचोली तिच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे राबिया खान यांचे म्हणणे आहे. जिया खान आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या सूरज पांचोलीला 1 जुलै रोजी जामिन मिळाला. सहा पानी सुसाईड नोटमध्ये जियाने सूरजवर शारीरिक-मानसिक छळ आणि बलात्काराचा आरोप लावला आहे. या सुसाईड नोटच्या आधारावरच मुंबई पोलिसांनी 11 जून रोजी सूरजला अटक केली होती.
आपल्या मुलीच्या गुन्हेगाराला शिक्षा व्हावी, असे राबिया खान यांचे म्हणणे आहे. राबिया खान यांनी अलीकडेच जियाची काही छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केली आहेत.
बघा जियाची आई राबिया खान यांनी सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केलेली जियाची शेवटची छायाचित्रे...