आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jiah Khan’S Suicide: Suraj Pancholi’S Father Aditya Pancholi Was Once Accused Of Raping Pooja Bedi’S Maid

वडिलांच्या पावलावर मुलाचे पाऊल, आदित्य पांचोलीवरही होता बलात्काराचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिया खानच्या आत्महत्येमागचे कारण आता उघड झाले आहे. जिया खानच्या सहा पानी सुसाईड नोटमध्ये जियाने काय लिहिले ते आता सगळ्यांसमोर उघड झाले आहे.

या पत्रात जियाने सूरजने तिच्यावर बलात्कार केला होता. त्याने तिचा गर्भपातही केला असल्याचे नमूद केले आहे. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी जियाने या जगाचा निरोप घेतल्यामुळे सगळेच हळहळले.

सूरज अभिनेता आदित्य पांचोली आणि अभिनेत्री जरीना वहाबचा मुलगा आहे. आदित्य आणि जरीना यांचे लग्न 1986 साली झाले होते. त्यानंतर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. सूरजच्या बहीणीचे नाव सना पांचोली आहे. सूरजचे आजोबा राजन पांचोली फिल्ममेकर होते. तर त्याच्या आजीचे नाव अरुणा होते.

या संपूर्ण प्रकरणावरुन सूरजने आपल्या वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवले, असेच म्हणावे लागेल. कारण सूरजचे वडील आणि अभिनेता आदित्य पांचोलीवरसुद्धा बलात्काराचा आरोप होता. काही वर्षांपूर्वी आदित्यचे पूजा बेदीबरोबर अफेअर होते. त्यावेळी आदित्यने पूजाच्या पंधरा वर्षीय मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर होता. आदित्यच्या कॅसानोवा इमेजमुळे त्याचा करिअर ग्राफही घसरला होता.