आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली : पोर्न स्टार सनी लियोनचा 'जिस्म २' हा मोस्ट अवेटेड चित्रपट अखेर शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये झळकला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाबद्दल भारतीय प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. इंडो-कॅनडियन वंशाची पोर्न स्टार सनी लियोन या चित्रपटात झळकली. हा चित्रपट रिलीज होताच इंटरनॅशनल मीडियामध्येही चर्चेचा विषय ठरला आहे. ब्रिटिश वृत्तपत्र 'गार्जियन'ने 'जिस्म २'बद्दल लिहिले की, ''उत्तेजक दृश्यचं या चित्रपटाचा यूएसपी असून भारतीय चित्रपटात उघडपणे असे दृश्य दाखवले जात आहेत.''
भारतीय चित्रपटांचा एक काळ असा होता, जेव्हा हिरो आणि हिरॉईनला आपल्या प्रेमाची कबूली सहजपणे देता येत नव्हती. प्रेक्षकांना हा सीन समजवून सांगण्यासाठी झाडे, फुल आणि पक्षी यांचा वापर दिग्दर्शकाला करावा लागायचा. किस आणि सेक्स सीनचा विचारही केला जात नव्हता. मात्र आता जसजसा काळ बदलतोय तसतसे बॉलिवूडने या गोष्टी अगदी सहजपणे स्विकारल्या आहेत. बॉलिवूड चित्रपटांचा कल अश्लिलतेकडे वाढताना दिसतोय. किस सीन आणि सेक्स सीन आता चित्रपटांमध्ये दिसणारी सामान्य गोष्ट झाली आहे. सेंसॉर बोर्डाकडून मिळणा-या 'ए सर्टिफिकेट'चा काही खास प्रभाव प्रेक्षकांवर पडत नाही.
सनीने नव्हे, या तरुणीने केले 'जिस्म 2' चे पोस्टर उत्तेजित, पाहा फोटो
भोपाळमध्ये 'जिस्म-२' चित्रपटाला तीव्र विरोध
PICS : 'जिस्म 2'साठी सनीने केले हॉट बेडरुम फोटोशूट
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.