आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • John Abraham Gifts A Bike To Shootout At Wadala Director Sanjay Gupta

REWARD: यशामुळे जॉन आनंदात, संजय गुप्ताला गिफ्ट केली 24 लाखांची बाईक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच रिलीज झालेल्या 'शुटआऊट अ‍ॅट वडाला' या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात 32.1 कोटींचा गल्ला जमवला आहे.

सिनेमाला मिळालेल्या यशामुळे अभिनेता जॉन अब्राहम सध्या खूप आनंदात आहे. या आनंदात जॉनने या सिनेमाचा दिग्दर्शक संजय गुप्ताला एक नवीन बाईक गिफ्ट केली आहे. जॉनने संजयला यामहाची मॅक्स क्रूजर मोटरसायक गिफ्ट केली असून या बाईकमध्ये V4 इंजिन आहे. भारतात या बाईकची किंमत 24 लाखांच्या घरात आहे.

एवढी महागडी बाईक गिफ्ट मिळाल्यानंतर संजय गुप्ता यांनी ट्विट केले की, ''आता मी यामहा मॅक्स क्रूजर मोटरसायकला मालक आहे. जॉन अब्राहमचे खूप खूप धन्यवाद. या सुंदर बाईकवरुन लाँग ड्राईव्ह जाण्यासाठी मी जास्त प्रतिक्षा करु शकत नाहीये. हे खूप मस्त गिफ्ट आहे.'' जॉनने दिलेल्या बाईकची छायाचित्रे संजयने शेअर केली आहेत.

संजयला मिळालेल्या गिफ्टची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...