मुंबई - अभिनयासह चित्रपट निर्मितीकडे वळलेला बॉलीवूडचा अभिनेता जॉन अब्राहम याचे बाइकसाठी असणारे प्रेम सर्वपरिचित आहे. याच प्रेमापोटी जॉन मोटारसायकल रेसिंगवर चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. त्याने स्वत: ट्विटरवर तशी घोषणा केली आहे. चित्रपटात बाइकवर जॉनने केलेल्या विविध स्टंटमुळे एका दिवसात त्याचे अनेक चाहते तयार झाले; पण मोटारसायकल रेसिंगशी संबंधित एक चांगला चित्रपट बनवण्याची गरज असल्याचे त्याचे म्हणणे आहे. 2006 मध्ये एका अपघातात जॉन जखमीदेखील झाला होता.