आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • John Abrahim At Song Launch Of Shootout At Wadala

PHOTOS : साँग लाँचिंगला ट्रकवर स्वार होऊन आला जॉन अब्राहम आणि धरला ताल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'शुटआऊट अ‍ॅट वडाला' या सिनेमातील 'आला रे आला मन्या आला..' हे गाणे 16 एप्रिलला लाँच करण्यात आले. सिनेमातील लाँचिंग इवेंटमध्ये अभिनेता जॉन अब्राहम मन्या सुर्वेच्या गेटअपमध्ये ट्रकवर स्वार होऊन जुहूतील चंदन थिएटरमध्ये दाखल झाला. ट्रकवरुन थाटात थिएटरमध्ये दाखल होताच प्रेक्षकांच्या मधून त्याने स्टेजवर एन्ट्री घेतली आणि आपले गाणे लाँच केले. इतकेच नाही तर जॉनने मंचावर या गाण्यावर तालही धरला. यावेळी संगीतकार अनू मलिकही हजर होते.
बालाजी मोशन पिक्चर्स निर्मित आणि संजय गुप्ता दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 1 मे रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या लाँचिंगची ही स्पेशल झलक...