आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोयंका कुटुंबाच्या शाही लग्नासाठी जोधपूरमध्ये पोहोचला जॉन अब्राहम, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - शुक्रवारी देशातील प्रसिद्ध व्यावसायिक घराण्यात शाही लग्नसोहळा पार पडला. विवेक गोयंका यांची मुलगी रेचेलच्या लग्नात अनेक दिग्गज मंडळी सहभागी झाली होती. यामध्ये कार्पोरेट, राजकीय आणि बॉलिवूडमधील मंडळींचा समावेश होता. जॉन अब्राहम, अरुण जेटली, एनके सिंह, शेखर गुप्तासह ब-याच दिग्गज मंडळींनी लग्नाला हजेरी लावून वर-वधूला आशीर्वाद दिला.
रेचेल आणि करण खेतरपाल यांचे जोधपूरमधील एका चर्चमध्ये लग्न झाले. त्यानंतर उम्मेद पॅलेसमध्ये रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. उम्मेद भवनमध्ये येणा-या पाहुण्यांसाठी ब्लॅक टाय आणि पार्टीसाठी लूज टाय ड्रेस कोड ठेवण्यात आला होता. त्यानंतर जोधपूरमधील ताज गेटवेमध्ये करण आणि रेचेलचे हिंदू पद्धतीने विवाहसोहळा पार पडणार आहे. त्याशिवाय पंजाबी पद्धतीनेही हा विवाहसोहळा रंगणार आहे.
कोण आहेत करण आणि रेचेल
रेचेल भारतातील मोठे मीडिया हाऊसचे मालक विवेक गोयंका यांची मुलगी आहे. तर करण दिल्लीतील उद्योगपती असून त्यांचा व्यवसाय दुबईतसुद्धा आहे. तीन दिवस चालणा-या या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने 20 फेब्रुवारी रोजी संगीत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या शाही विवाहसोहळ्याची छायाचित्रे...