आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉन ठरणार बी टाऊनचा SHIRTLESS दिसणारा पहिला डॉन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'शूटआऊट अ‍ॅट वडाला' या सिनेमात अभिनेता जॉन अब्राहमने गँगस्टर माया सुर्वेची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे मोठ्या पडद्यावर शर्टलेस दिसणारा जॉन अब्राहम पहिलाच डॉन ठरला आहे. बॉलिवूडमध्ये आजवर रिलीज झालेल्या अंडरवर्ल्डवर आधारित सिनेमांमध्ये अभिनेते कधीही शर्टलेस दिसलेले नाही.

याविषयी सिनेमाचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी सांगितले, ''ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा एखाद्या डॉनला शर्टलेस दाखवण्यात येईल. असे याआधी कधीही घडलेले नाही आणि भविष्यात घडेल असेही वाटत नाही. कारण जॉनला काँम्पिट करणारा कुणीच नाही.''

तसे पाहता जॉनला त्याचे चाहते पहिल्यांदाच शर्टलेस झालेला बघणार नाहीयेत. कारण यापूर्वी 'दोस्ताना' आणि 'देसी बॉईज' या सिनेमांमध्ये जॉनने आपला शर्ट काढला होता. मात्र यावेळी जॉनचे एट पॅक अ‍ॅब्स त्याच्या चाहत्यांना बघायला मिळणार आहेत.