आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शूट आऊट अ‍ॅट वडाला'मध्ये जॉन अब्राहमचा डॅशिंग लूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता जॉन अब्राहम सध्या त्याच्या आगामी 'शूट आऊट अ‍ॅट वडाला' या सिनेमाच्या रिलीजची आतुरतेने वाट बघत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. या सिनेमात जॉन अगदी हटके लूकमध्ये दिसणार आहे. या लूकविषयी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची जॉन आतुरतेने वाट बघतोय. या सिनेमात जॉनने गँगस्टर मान्या सुर्वेची भूमिका साकारली आहे.

या सिनेमातील लूकविषयी जॉनने सांगितले की, ''मला या भूमिकेसाठी मान्या सुर्वेचा फक्त एक पासपोर्ट फोटो मिळाला होता. मान्या सुर्वे नेहमी ज्या ज्या ठिकाणी जायचा त्या सर्व ठिकाणी मी भेट दिली. मी या लूकसाठी भरपूर मेहनत घेतली आहे. मला या इंडस्ट्रीत दहा वर्षे झाली आहेत. मात्र या सिनेमाद्वारे मी पुन्हा फिल्म इंडस्ट्रीत लाँच होतोय. त्यामुळे मी खूपच उत्सुक आहे.''

या सिनेमात जॉनने कोल्हापूरी चप्पल घातली असून कपाळावर टिका आणि डोक्यात भरपूर तेल घातले आहे.
1 मे रोजी रिलीज होणा-या आणि सत्य घटनेवर आधारित असलेल्या या सिनेमात जॉनबरोबर कंगना राणावत, मनोज बाजपेयी, तुषार कपूर, सोनू सूद, महेश मांजरेकर, सिद्धार्थ कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.