आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुदत्त यांना हसवण्यात यशस्वी झालेला एक बस कंडक्टर झाला जॉनी वॉकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

11 नोव्हेंबर 1926 रोजी इंदौर येथील एका कापड गिरीणीत काम करणा-या मजुराच्या घरी मुलगा जन्माला आला. त्या मुलाचे नाव होते बदरुद्दीन जमालुद्दीन काजी. पंधरा सदस्य असलेल्या कुटुंबात एकमेव कमावत्या व्यक्तिची नोकरी सुटल्यानंतर ते सर्वजण मुंबईत दाखल झाले. येथे तरुण बदरुद्दीनला बस कंडक्टरला नोकरी मिळाली.
अभिनेता, लेखक बलराज साहनी यांनी या बस कंडक्टर तरुणाची भेट दिग्दर्शक गुरुदत्त यांच्याबरोबर घालून दिली. हाच तरुण बदरुद्दीन जमालुद्दीन काजी पुढे बॉलिवूडचा प्रसिद्ध हास्य अभिनेता जॉनी वॉकर म्हणून प्रसिद्ध झाला.
आज (29 जुलै) जॉनी वॉकर यांची पुण्यतिथी आहे.
एक नजर टाकुया त्यांच्या जीवनावर...