आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jolly LLB Actress Discovered By The Director Accused Of Sexual Abuse, Even Slapped

'जॉली LLB'च्या दिग्दर्शकावर अभिनेत्रीने लावला लैंगिक शोषणाचा आरोप, कानशिलात लगावली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री गीतिका त्यागीने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक खळबळजनक व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये 'जॉली LLB'चे दिग्दर्शक सुभाष कपूर, त्यांची पत्नी आणि 'औरंगजेबचे' दिग्दर्शक अतुल सबरवाल दिसत आहेत. हा व्हिडिओ मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास अपलोड करण्यात आला. या व्हिडिओत सुभाष कपूर, गीतिकासोबत केलेल्या लैंगिक शोषणावर चर्चा करताना दिसत आहे.
व्हिडिओत कपूर म्हणताना दिसत आहेत, 'आमच्या दोघांत जे काही घडले त्याची मला लाज वाटत आहे. आता आम्हा दोघांनाही याचे परिणाम भोगण्यास तयार राहायला हवे. मला आता काय करायचे आहे, ते माहित नाही.'
व्हिडिओत कपूर यांची पत्नी म्हणतेय, की या घटनेमुळे ती उद्धवस्त झाली आहे. आता त्यांच्या मुलांना वडिलांच्या कृत्याचा सामना करावा लागणार आहे. वडील आपल्या मुलांची रक्षा करत असतात, मात्र आता वडिलांनी जे केले त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत.
तर व्हाट द फिश, वन वाइ टू या सिनेमांमध्ये झळकलेली गीतिकाचे म्हणणे आहे, 'मी आता एकाही व्यक्तिवर विश्वास ठेऊ शकत नाहीये. मी माझे वडील, भाऊ-वहिनी यांचा सामना करु शकत नाहीये.' सुभाष कपूर यांच्याशी झालेल्या वादादरम्यान गीतिकाने हा व्हिडिओ बनवला होता.
कोण आहे गीतिका त्यागी?
25 सप्टेंबर 1989 रोजी जन्मेली गीतिका बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण करण्यासाठी धडपडत आहे. गेल्यावर्षी रिलीज झालेल्या आत्मा या सिनेमात ती झळकली होती. 2008पासून तिने मोजक्या सिनेमांमध्ये अभिनय केला. 2011मध्ये रिलीज झालेल्या द इक्लिप्स ऑफ तारेगना या सिनेमातही काम केले होते. गीतिकाच्या वडिलांचे नाव नरेंद्र पाल त्यागी तर आईचे नाव पुष्पा त्यागी आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, व्हिडिओविषयी गीतिकाचे मित्र दानिश रजा आणि सुभाष कपूर यांचे काय म्हणणे आहे....