आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : पाहा बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टाच्या आयटम साँगची खास झलक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्‍लॅमरस शटलर ज्‍वाला गुट्टा बॅडमिंटन कोर्टशिवाय सिल्‍वर स्‍क्रीनवरही धमाका करण्‍यासाठी सज्‍ज झाली आहे. तिने एका तेलगु सिनेमात चक्क आयटम सॉंग केले आहे.

ज्‍वालाचा जवळचा मित्र आणि या सिनेमाचा नायक नितीनने ज्‍वालाला आपल्‍या सिनेमात आयटम साँग करण्‍याची विनंती केली होती. ज्‍वालाने नितीनचा हा प्रस्‍ताव स्‍वीकारून पहिल्‍यांदाच फिल्‍मी दुनियेत पाऊल ठेवले. हा सिनेमा येत्या 19 एप्रिलला रिलीज होणार आहे.

दिल्‍लीमध्‍ये पार पडलेल्‍या राष्‍ट्रकूल क्रीडा स्‍पर्धेतील दुहेरीच्‍या सामन्‍यात सुवर्ण आणि मिश्र दुहेरीमध्‍ये रजत पदक पटकावलेल्‍या ज्‍वालाने 13 वेळा राष्‍ट्रीय चॅम्पियनशीपचे जेतेपद आपल्‍या नावी केले आहे.

divyamarathi.com च्या वाचकांसाठी आम्ही खास ज्वालाच्या पहिल्यावहिल्या आयटम साँगची खास झलक घेऊन आलो आहोत.

व्हिडिओवर क्लिक करा आणि पाहा ज्वालाचा धमाकेदार आयटम नंबर...