आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यावर झळकणार कादर खानची तिसरी पिढी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकाच कुटुंबातील तिसरी पिढ्या पुन्हा रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. अभिनेता कादर खान एक चित्रपट बनवणार आहेत. त्याचे नाव ‘इन योर आर्म्स’ असे आहे. हा चित्रपट त्यांच्या कुटुंबातील तीन पिढ्यांवर बनवला जाणार आहे.
कादर खान यांनी या चित्रपटात आपल्याच दोन मुलांना सरफराज आणि शाहनवाज (चित्रपटाचे दिग्दर्शकदेखील हेच आहेत) यांना मुख्य भूमिकेत घेतले आहे. कादर खान म्हणाले की, माझ्या मुलांना आणि नातवांना घेऊन चित्रपट बनवण्याची माझी खूप दिवसांपासून इच्छा होती.
जेव्हा ते कथा लिहित होते तेव्हा वाटले की चित्रपटाच्या कथेत हेच फिट बसतील. हा चित्रपट माझ्या खूप जवळचा असल्याचे ते म्हणाले. राज कपूर यांनीदेखील 1971 मध्ये ‘कल आज और कल’ नावाने एक चित्रपट बनवला होता. त्यात त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर, स्वत: राज कपूर आणि मुलगा रणधीर कपूरने काम केले होते.
(छायाचित्रात कादर खान मुलगा सरफराज आणि शाहनवाजसोबत)