आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कादर खान लिहित आहेत मुलासाठी कथा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कादर खान चित्रपट क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी मुंबईतील एका कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. शिवाय नाटकामध्येदेखील त्यांनी काही भूमिका साकारल्या. आता ते छोटा मुलगा शाहनवाजचे बॉलिवूड करिअर सुरू करण्यापूर्वी नाटकामध्ये सक्रिय होऊन काम करत आहेत.
सरफराज या कादर खान यांच्या मोठा मुलाने ‘तेरे नाम’, ‘वाँटेड’, ‘जिंदगी न मिलेगी दोबारा’ आणि ‘रमय्या वस्तावय्या’ या काही चित्रपटांत अभिनय केला आहे; परंतु छोटा मुलगा शाहनवाजने अद्याप तरी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला नाही. परंतु, व्हीलचेअरवर बसलेल्या कादर खान यांनी आपल्या धाकट्या मुलासाठी पुन्हा लेखणी हातात धरली आहे. आरोग्याशी संबंधित तक्रारीमुळे काही वर्षांपासून कादर खान यांनी लिखाण आणि अभिनयापासून स्व:तला दूर ठेवले होते. त्यांनी अमिताभ बच्चनच्या ‘अग्निपथ’(1990) चित्रपटाचे स्क्रीनप्ले लिहिलेले आहेत. शिवाय ‘कर्मा’, ‘सरफरोश’, ‘हम’, ‘मि.नटवरलाल’, ‘कुली नं 1’, ‘मैं खिलाडी तू अनाडी’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘इन्कलाब’ आणि ‘अंगार’ यांसारख्या 250 चित्रपटांचे डॉयलाग लिहिले आहेत.
कादर खान त्यांचा छोटा मुलगा शाहनवाजसाठी एक कथा लिहीत असून ती नाटकाच्या माध्यमातून मांडली जाणार आहे. नाटकातील संघर्षानंतर शाहनवाजचे अभिनय कौशल्य समोर येईल आणि त्यानंतरच तो बॉलिवूडमध्ये आपली एक स्वत:ची वेगळी ओळख बनवू शकेल. ‘हमारे भी हैं मेहरबा कैसे कैसे’ हे त्या नाटकाचे शीर्षक असणार आहे. शाहनवाज या नाटकाच्या दिग्दर्शनाबरोबर अभिनयदेखील करणार आहे. स्वत: कादर खान यांची या नाटकामध्ये भूमिका आहे. याचे सादरीकरण फेब्रुवारीच्या शेवटी मुंबईमध्ये होणार असून यानंतर पथक बाकी शहरामध्ये पाठविले जाईल. आम आदमी आणि त्याच्या नावावर चालत असलेले राजकारण पाहून कादर खान लवकरच या नाटकाची पटकथा पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत.