आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

39 वर्षांची झाली काजोल, बघा बालपणीचे RARE PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'बाजीगर', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम' यांसाख्या सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री काजोल हिचा आज (5 ऑगस्ट) वाढदिवस आहे. 5 ऑगस्ट 1972 रोजी जन्मलेली काजोल 39 वर्षांची झाली आहे. काजोल अभिनेत्री तनुजा आणि दिग्दर्शक शोमू मुखर्जी यांची मुलगी आहे. काजोल शालेय शिक्षण घेत असताना तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात झाली होती. वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजेच 1992 साली 'बेखुदी' या सिनेमाद्वारे काजोलने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.
अभिनय क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी काजोलने शिक्षण अर्धवट सोडले. काजोलचा पहिला सुपरहिट सिनेमा म्हणजे 1993 साली रिलीज झालेला 'बाजीगर'. या सिनेमात काजोल अभिनेता शाहरुख खानबरोबर झळकली होती. शाहरुख आणि काजोलच्या जोडीला रुपेरी पडद्यावरील हिट जोडी समजली जाते.
1997 साली रिलीज झालेल्या 'गुप्त' आणि 1998च्या 'दुश्मन' सिनेमातील भूमिकेसाठी काजोलचे कौतुक झाले होते. सध्या काजोल फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असून सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवत आहे. विधवा आणि अनाथ मुलांसाठी काजोल समाजकार्य करत आहे. या कामासाठी तिला 2008 साली कर्मवीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय भारत सरकारने 2011 साली पद्मश्री पुरस्करा देऊन काजोलचा गौरव केला आहे.
एक नजर टाकुया काजोलच्या बालपणीच्या खास छायाचित्रांवर...