आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kali Kochalin Share Screen Space With Saif Ali Khan

सैफसोबत रोमान्स करणार कल्की

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकअभिनेत्री कल्की कोचलीन नवाब सैफ अली खानसोबत रूपेरी पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आणि ‘ये जवानी है दिवानी’मध्ये आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना भुरळ घालणारी कल्की सैफ अली खानसोबत निधीमोरू आणि कृष्णा डीके यांच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या एका सिनेमात काम करत आहे. या सिनेमात इलेना डिक्रूजसुद्धा मुख्य भूमिकेत आहे, तर प्रीती झिंटा या सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका करणार आहे.

कल्की म्हणाली की, या सिनेमात मी काम करत आहे. दिग्दर्शकांच्या जोडीमुळे मी प्रभावित आहे. त्यांचा विनोदी स्वभाव मला फार आवडतो. सिनेमाची कथा चांगली आहे. हा एक विनोदी सिनेमा आहे. राज निधीमोरू आणि कृष्णा डीके दिग्दर्शित ‘गो गोआ गॉन’ अलीकडेच प्रदर्शित झाला होता. या सिनेमात सैफ अली खान, कुणाल खेमू आणि पूजा गुप्ता मुख्य भूमिकेत होते.