आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुराग आणि कल्कीमध्ये दुरावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि त्यांची पत्नी व अभिनेत्री कल्की कोचलिन यांनी आपण विभक्त असल्याची घोषणा केली आहे. अलीकडेच दोघांमध्ये वाद झाल्याची बातमी आली होती. दरम्यान बुधवारी दोघांनी संयुक्तरीत्या माध्यंमाना एक पत्र दिले. त्यात ‘मी आणि कल्की वेगळे होत आहोत. काही गोष्टीवर निर्णय घेण्यासाठी आम्हाला वेळ लागेल. आम्ही आताच घटस्फोट घेणार नाही. त्यामुळे माध्यमांना विनंती आहे की, आमच्या खासगी आयुष्याचा मान ठेवावा आणि अफवा उडवू नये, धन्यवाद कल्की आणि अनुराग.’
29 वर्षांची कल्की आणि 41 वर्षाचे अनुराग 2009 मध्ये ‘देवडी’ चित्रपटाच्यावेळी जवळ आले होते. त्यांनी एप्रिल 2011 मध्ये लग्न केले होते.