आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे गेली एकताची तिसरी ‘डायन’ ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकता कपूर सध्या आपल्या 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तिच्यासोबत काही दिवसांपासून सिनेमात मुख्य भूमिका साकारणार्‍या हुमा कुरैशी आणि कोंकणा सेन शर्माच दिसत आहेत. मात्र तिसरी हिरोइन कल्की कोचलिन आतापर्यंत एकाही प्रमोशनमध्ये दिसली नाही. यातील खरी गोष्ट अजून कळली नाही. मात्र कल्की आणि एकतामध्ये कुरबूर झाल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे डायनचे सस्पेंस गुपित राहावे म्हणून एकता कल्कीला प्रमोशनपासून दूर ठेवत असल्याची अफवादेखील आहे. काही का असेना, हा सिनेमा थोडा वेगळा आहे आणि लोकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरेल, असे दिसते.