आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kamal Haasan Says I Am Happy With Padma Bhushan But..

कमल हसन म्हणतात, पद्मभूषण मिळाल्याने खुश, पण..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पद्मश्री हा भारताचा प्रतिष्ठित पुरस्कार अभिनेता आणि दिग्दर्शक कमल हसन यांना याआधीच मिळाला आहे. आता कमल हसन यांना भारत सरकाराच्यावतीने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मात्र, कमल उपरोधाने म्हणतात, ‘आता एक पाऊल पुढे जाणे जास्त आनंदाची बाब आहे. जिवंतपणी हा पुरस्कार मिळत असल्याने मी खुश आहे. अनेक वेळा मोठे कार्य करणार्‍या लोकांचे या देशात विस्मरण होते. असो, माझी या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल मी त्याचा विनम्रतेने स्वीकार करतो.’
शिक्षण तज्ज्ञ आणि कवी वैरामुथू रामासामी थेवर यांसारख्या लोकांसोबत हा पद्मभूषण पुरस्कार दिला जात असल्यामुळे ते जास्त खुश आहेत. याबाबत कमल म्हणाले की, ‘ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी माझ्या चित्रपटांची अनेक चार्टबस्टर गाणी शब्दबद्ध केली आहेत. हा पुरस्कार त्यांना 20 वर्षांपूर्वीच देता आला असता. तेव्हासुद्धा ते तेवढेच मोठे लिजेंड होते जेवढे आज आहेत. माझ्यासाठी वैरामुथू यांच्या बरोबरीने उभे राहणे एखादे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे.’
चर्चेदरम्यान कमल म्हणाले की, ‘बरेच कवी आणि शास्त्रज्ञांचे विस्मरण होते. आजपर्यंत कवितेला तिची योग्य जागा मिळालेली नाही. ‘चाची 420’ मधील माझा, मै एक असिस्टंट कोरिओग्राफर हूं, हा संवाद होता. त्याचे उत्तर होते, वो तो ठीक है लेकिन आप काम क्या करते हैं?’ प्रत्येक क्षेत्रात होणार्‍या चांगल्या कामांची दखल घेत त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे. असे झाले तरच या पद्म पुरस्कारांची खरी पारख होईल, असेही कमल हसन म्हणाले.