आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kamal Hassan Ready To Delete Controvercial Scens From Vishwaroopam

'विश्वरुपम'मधून वादग्रस्त दृश्ये काढण्यास कमल हसन तयार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कमल हसन यांनी एक पाऊल मागे घेत 'विश्वरुपम' या सिनेमातील वादग्रस्त दृश्ये काढण्यास होकार दिला आहे. मुस्लिम संघटनांबरोबर झालेल्या चर्चेनंतर कमल हसन यांनी हा निर्णय घेतला आहे.

मुस्लिम समुदायाने कमल हसन यांच्या 'विश्वरुपम' या सिनेमाला विरोध दर्शवला होता. सिनेमात मुस्लिम समाजाबाबत चुकीचं चित्र रंगवल्याचा आरोप काही संघटनांनी केला होता. त्यामुळे तामिळनाडूसह अनेक शहरांमध्ये हा सिनेमा रिलीज होऊ शकला नाही. याविरोधात कमल हसन यांनी हायकोर्टाकडे धाव घेतली होती. अद्यापही हा सिनेमा तामिळनाडूमध्ये रिलीज होऊ शकलेला नाही. आज (बुधवारी) तामिळनाडू हायकोर्टात या प्रकरणावर सुनावणी झाली. हायकोर्टाने अद्याप निर्णय राखून ठेवला असून येत्या सोमवारी यावर सुनावणी होणार आहे. दोन सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये सिनेमाचे रिलीज आणखी लांबणीवर पडले आहे.

मात्र कमल हसन यांनी आता वादग्रस्त दृश्ये काढण्यास होकार दिल्यामुळे सिनेमाविषयीच्या वादाला पूर्णविराम मिळणार अशीच चिन्ह दिसत आहेत.