आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचेन्नई - अभिनेता कमल हसन यांच्या 'विश्वरुपम' या सिनेमाचा वाद चिघळतच चालला आहे. या सिनेमाला अद्याप प्रदर्शनासाठी ब-याच ठिकाणी हिरवा कंदील मिळालेला नाहीये. यावर कमल हसन यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
चेन्नईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत कमल हसन यांनी न्याय मिळाला नाही तर भारत सोडून जाणार असल्याचे म्हटले आहे. एखाद्या धर्मनिरपेक्ष देशात जाऊन राहील, असे कमल हसन म्हणाले. दिवंगत एम. एफ हुसैन यांनासुद्धा देश सोडावा लागला होता. आता हीच वेळ माझ्यावरसुद्धा आली आहे. मी या सिनेमावर खूप पैसे लावले आहे. मला माझ्याच देशातच अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय, असे कमल हसन म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ''मी सध्या हायकोर्टाच्या निकालाची वाट बघतोय. जर मला न्याय मिळाला नाही, तर मी देश सोडून जाणार आहे.''
मुस्लिम समुदायाने कमल हसन यांच्या 'विश्वरुपम' या सिनेमाला विरोध दर्शवला होता. सिनेमात मुस्लिम समाजाबाबत चुकीचं चित्र रंगवल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे.
या संपूर्ण वादाला कमल हसन यांनी सांस्कृतिक दहशतवाद असे म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.