Home »Top Story» Kangana Not Want To Go Pakistan

'रज्जो'चा लाहोरला नकार ?

दिव्य मराठी वेब टीम | Feb 23, 2013, 10:32 AM IST

  • 'रज्जो'चा लाहोरला नकार ?

बॉलिवूडमध्ये हटके भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध असलेली कंगना राणावत प्रत्येक सिनेमासाठी मेहनत घेत असते. सध्या ‘रज्जो’ नावाच्या बहुचर्चित चित्रपटासाठी कंगना परिश्रम घेत आहे. कंगना 'रज्जो' सिनेमात कोठेवालीची भूमिका साकारत आहे. कोठेवालीचे आयुष्य कळावे म्हणून तिने मुंबईतील काही कोठय़ांना भेटी देऊन तेथील महिलांशी चर्चा केली, पण मुंबईत फारशा कोठेवाल्या नसल्याने तिच्या टीमने लाहोरच्या प्रसिद्ध हिरा मंडीला भेट देण्याचा निर्णय घेतला. कंगनाने या ठिकाणच्या प्रसिद्ध कोठय़ांना भेट द्यावी, असे टीमला वाटत होते, पण कंगनाने पाकिस्तान भेटीवर साशंकता व्यक्त करत त्यांची योजना फेटाळून लावली.

पाकिस्तानात आपण प्रसिद्ध असून अशा प्रकारे लाहोरला भेट दिल्यास प्रसारमाध्यमे आणि चाहत्यांना टाळणे शक्य नाही. तसेच सुरक्षेचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला जाऊ शकतो, असे सांगत कंगनाने लाहोरला नकार दर्शवला आहे. मुंबई, लखनऊ येथील कोठय़ांना भेटी देऊन कोठेवालीचे जीवन जाणून घेण्याचा प्रयत्न कंगना करणार आहे.

Next Article

Recommended