आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहापूर्वीच हनीमुन टीप्‍स मागत आहे कंगना!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील काही दिवसांपासून कंगना जगभरामध्‍ये भ्रमंती करत असताना हनीमुनच्‍या टीप्‍स मागताना दिसून येते आहे. आगामी शुटींग होत असलेल्‍या 'क्‍वीन' या चित्रपटांच्‍या मुख्‍य भूमिकेत ती दिसणार आहे.
या चित्रपटाचे चित्रिकरण तीन देशातील 140 ठि‍काणी झाली आहे. या चित्रपटाचे दिग्‍दर्शन 'चिल्‍लर पार्टी' फेम विकास बहल करत आहेत. या चित्रपटात दिल्‍लीतील एका साध्‍या मुलीची कथा मांडली आहे.
चित्रपटातील काही भागाचे चित्रिकरण विकास बहल यांनी दिल्‍लीतील लाजपतनगर, अलकनंदा बाजार, दिल्‍ली हाट, साकेत आणि डी यु च्‍या दक्षिण परिसरात केले आहे. या भागामध्‍ये चित्रिकरण करण्‍याचे विशेष कारण म्‍हणजे बहल यांचे बालपणसुध्‍दा याच भागात गेले आहे.या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रसिध्‍द झाला आहे. त्‍यामध्‍ये कंगणा लोकांना विचारणा करताना दिसत आहे, की 'तुम्‍ही हनीमूनमध्‍ये काय- काय केले? मी पहिल्‍या वेळेस मधूचंद्र साजरा करत आहे'. प्रेक्षक मोठ्या आवडीने हा ट्रेलर बघत आहेत. 'क्‍वीन' साठी प्रेक्षक बरेच उत्‍सुक आहेत.