आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘क्वीन’च्या प्रदर्शन तारखेवरून निर्मात्यांमध्ये मतभेद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंगना राणावत आणि राजकुमार राव यांची प्रमुख भूमिका असणारा विकास बहल दिग्दर्शित ‘क्वीन’च्या अडचणी संपण्याचे चिन्ह नाही. पूर्वी 'क्वीन' हा चित्रपट 'शादी के साइड इफेक्ट'सोबत 28 तारखेला प्रदर्शित होणार होता; पण त्याचे प्रदर्शन 7 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्यामुळे निर्मात्यांमध्ये मतभेद झाले आहेत.
एकीकडे फँटम फिल्मच्या बॅनरअंतर्गत अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी, मधू मेनटेना आणि विकास बहल हे निर्माते आहेत, तर दुसरीकडे जागतिक वितरक व्हायाकॉम 18. फँटमने स्वेच्छेने जी तारीख वाढवली होती, त्यावरून व्हायाकॉम 18 नाराज आहे. त्याचे कारणदेखील महत्त्वाचे आहे.
7 मार्चला तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘गुलाब गँग’, ‘टोटल सियाप्पा’ आणि हॉलीवूडपट ‘300 : राइज ऑफ अँन अम्पायर’ हे ते तीन चित्रपट आहेत. म्हणून क्वीनचे प्रदर्शन एक आठवड्यानंतर 14 तारखेला व्हावे अशी व्हायाकॉमची इच्छा आहे; पण फँटमच्या आडमुठ्या धोरणामुळे तेढ वाढली आणि तारीख टळली नाही. या वादाचा प्रमोशनवर मोठा परिणाम झाला.