आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना राणावत पहिली ‘सुपरवुमन’ येणार प्रेक्षकांच्या भेटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हॉलीवूडमध्ये आजवर अनेक सुपरवुमन प्रेक्षकांना पाहण्यास मिळाल्या. मात्र, बॉलीवूडमध्ये सुपरवुमन तशा अभावानेच दिसून आल्या. प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या आगामी बहुचर्चित ‘क्रिश-3’ चित्रपटात अभिनेत्री कंगना राणावत सुपरवुमच्या भूमिकेत दिसणार आहे.

रोशन यांनी ‘कोई मिल गया’ या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटाला पहिला सुपरहीरो दिला. हाच फंडा वापरत ते आता ‘क्रिश 3’ घेऊन येत आहे. क्रिशच्या सुपरपॉवरला काट्याची टक्कर देण्यासाठी पहिल्यादांच रोशन एक सुपरवुमनही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असून कंगनाने यात तेवढय़ाच ताकदीने अभिनय केला आहे. शंभर मजली इमारतींवरून उडी टाकण्यासह अनेक पॉवर असलेली ही सुपरवुमन क्रिशच्या नाकीनऊ आणताना चित्रपटात दिसणार आहे.

कंगनाच्या लूकसाठी विशेष लक्ष दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. कंगनाने 2011 पासून या भूमिकेची तयारी केली होती आणि रोशन यांनी एक खास ट्रेनरही ठेवला होता. कंगना सुपरवुमन दिसावी यासाठी लेटेक्स रबराने एक खास सूट तयार केला. गेविन मिगुएलने जवळ-जवळ 25 डिझाइन तयार केले होते. त्यानंतर एक डिझाइन फायनल करण्यात आले. हा सूट तयार करण्यासाठी 45 दिवस लागले. सूट घालण्यासाठी दोन तास लागत आणि शरीराला संपूर्ण चिकटणारा हा ड्रेस खूप गरम असतो, परंतु तरीही कंगनाने हा सूट घालून अनेक साहसदृश्ये दिली आहेत. केवळ सूटच नव्हे तर कंगनाची हेअर स्टाइल आणि शूजही सुपरवुमनच्या लूकला साजेसे तयार करण्यात आले आहेत.

‘क्रिश’नंतर अभिषेक बच्चनने ‘द्रोणा’मध्ये सुपरनायक साकारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा प्रयत्न फसला. तसेच प्रियंका चोप्रानेही असाच काहीसा धाडसी निर्णय घेतला होता, परंतु हृतिकची सर कोणालाही नाही.